Ganpati Bappa Aarti
सुखकर्ता दु:खकर्ता
सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।। वंâठी झळके माळ मुक्ताफळांची ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन: कामना पुरती ।।
रत्नखचित हरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी वुंâकुमकेशरा ।।
हिरेजडित मुवूâट शोभतो बरा ।। रुणझुणती नुपुर्रे चरणी घागरीय ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।। संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे
सुरवरवंदना ।। जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।। दर्शन ।।
Ganpati Bappa Aarti
।। श्री गजानना ।।
श्री गजानना जय गजानना पार्वतीच्या सुकुमार रे । तुला मोदक आवडे
फार रे.. (२) सुंदर दिसतो । सिंहासनी बसतो .. (२) शेंदुर चर्चितो लाल रे
तुला ।। दुर्वा हराळी बहु प्रेमाची ।..(२) मोदक भक्षितो फार रे तुला।।
अग्र पुजेचा तु अधिकारी।..(२) करी विघ्नांचा संहार रे तुला ।।
भाद्रपदाच्या शुध्द चतुर्थिला ।..(२) दरवर्षी येणार रे तुला।।..
एका जनार्दनी म्हणे रमापती ।..(२) सेवक गुंफितो हार रे।
तुला मोदक आवडे फार रे.. तुला ।।
।। एकरदना गजवदन देवा ।।
एकरदना गजवदना देवा । लंबोदर सगुना ओ देवा २ ।।
मूषक वाहन वरदा देवा । विद्या निधी गहना ओ देवा २ ।।
गंडस्थल मद श्रविता देवा । मधुकर रस भ्रमणा ओ देवा २ ।।
सुंडा सुंदर मंडीत देवा । शशिभूषण वदना ओ देवा २ ।।
पार्वतीपुत्र गजानन देवा । जय जय गणनाथ ओ देवा २ ।।
।। जय जय जय मयुरेश्वरा ।।
जय जय जयमयुरेश्वरा । पंचारती ओवाळू हरा . . (२)
जय जय जयमयुरेश्वरा ।।
शोभती सुंदर कमला सन हे । रत्नजडीत शिरी कुवूâट विराजे ।।
पायी घागरी रुणझुण वाजे । श्रीधरा करुणा करा ।। धृ.१।। जय जय
……
checkout other Ganpati aartis from our site